शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

गझल


कुणा सांगू कसे सांगू तुझी ती याद आली तर
समेवर दुःख विरहाचे अशातच दाद आली तर.
खुशाली स्वप्न भासांची,दिखाऊ घोषणा सा-या
भुकेने वांझ ओठांवर मग फरीयाद आली तर.
उभा हा जन्म डागाळे भ्रमाचे रक्त मुरताना
पुन्हा पाऊल का थांबे जराशी साद आली तर.
किती घंटी नकाराची,कसे ते तर्कही खोटे
कधी मग ठाम निश्चीती जरा अपवाद आली तर.
कशी भांगात मातीच्या दिसे ती आग वणव्याची
ढगांची नेमकी मस्तीच सालाबाद आली तर।
मुत्यूची बातमी येताच जो इमेल पाठवतो
उरकुन घ्याच बापाचे अशी अवलाद आली तर!
Image may contain: plant and outdoor

●रवींद्र जवादे

kavita